Header Ads

कसं तयार झालं Whatsapp? Whatsapp Biography In Marathi...

       आज Whatsapp कोणाला माहीत नाही, Whatsapp मोबाइल मध्ये नाही असं सहसा कोणी आढळत नाही. आजच्या दिवसात  Whatsapp सर्वात जास्त वापरलं जाणार Messenger App बनलं आहे. आजच्या दिवसात कोणी पण नवा मोबाइल फोन घेतला की त्यावर सर्वात पहिले Whatsapp इंस्टाल करतो. अशा आपल्या या प्रिय App बद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे.


Whatsapp ची सुरुवात 2009 मध्ये दोन मित्र ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी केली होती.  ब्रायन ऍक्टन Yahoo! मध्ये इंजिनीयर होते तर जेन कॉम Woo Woo या हॅकर ग्रुप मध्ये काम करत होते.जेन कॉम यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1976 साली युक्रेन मधील किव नावाच्या एका छोट्याश्या गावात झाला होता. ते मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. त्यांचे वडील बिल्डर होते. जेन कॉम चे शिक्षण San Jose State University, California झाले. नंतर त्यांनी अमेरिका मधून Computer Science आणि math मधून शिक्षण पूर्ण केले. 1997 मध्ये जेन Yahoo! मध्ये Infrastructure Engineer म्हणून काम करू लागले

ऍक्टन यांचा जन्म 17 फेब्रुवारी, 1972 ला Michigan शहरात झाला होता. पण त्याचं बालपण Central Florida मध्ये गेलं. ऍक्टन यांनी 1994 ला stanford University मधून Computer Science चे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण केल्या नंतर ते apple मध्ये Software engineer या पदावर काम करू लागले. त्यानंतर त्यांनी Adobe मध्ये सुद्धा काम केलं. 1996 मध्ये ते याहू! मध्ये काम करायला लागले.

आणि याच Yahoo! च्या ऑफिस मध्ये त्यांची पहिली भेट झाली. त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात चांगलं ज्ञान असल्याने ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. जवळजवळ 10 वर्ष सोबत काम केल्यानंतर दोघांनी Yahoo! मधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नोकरी 2007 साली सोडली आणि स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्याची योजना आखू लागले.

Whatsapp बनवण्याची Idea पहिले जेन कॉम यांना आली जेव्हा ते TV बघत होते. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण अस app बनवलं ज्या मुळे आपण आपल्या मित्रांना एखादी बातमी पोहोचू शकवू. आणि त्या काही खर्च ही नाही होवो. ही idea जेव्हा कॉम नि ऍक्टन यांना सांगितली तेव्हा त्यांनी काही ती पटली नाही पण काही दिवसानंतर ते तयार झाले
त्यानंतर दोघेही जीवतोडुन अँप तयार करण्यात लागले. दोघांना पण Programmingच  चांगलं Knowledge होतं ज्यामुळे त्यांचं अँप लवकर तयार झालं. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांना खूप प्रॉब्लेम्स आले. यासाठी त्यांना खूप खर्च सुद्धा आला होता. सुरुवातीला जेव्हा User Whatsapp इन्स्टॉल केल्यानंतर जो otp Msg येत होता त्याचे पैसे कॉम च्या बँक अकाउंट मधून कटत होते.

त्या दोघांनी खूप साऱ्या प्रोब्लेम्सना face केलं. एकदा तर  कॉम च्या मनात Whatsapp बंद करण्याचा विचार सुद्धा आला होता. परंतु एक्टन ने कॉम ला समजावलं की यावेळी जर आपण Whatsapp ला बंद केलं तर ते आपल्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय ठरेल. त्यानंतर दोघेही Whatsapp च्या devlopment मध्ये लागले आणि एक दिवस त्यांच्याकडे Whatsapp ला पुढे नेण्यासाठी एक रुपया सुद्धा राहिला नव्हता.

तेव्हा त्यांनी Whtsapp ला पुढे नेण्यासाठी नोकरी करण्याचे ठरवले. पहिले ते Facebook मध्ये गेले तेथे त्यांना रिजेक्ट केलं गेलं. त्यानंतर त्यांनी Twitter मध्ये try केलं पण तिथेही त्यांना Reject करण्यात आलं. त्यांनी कोठेही नोकरी भेटत नव्हती आणि पैसे नसल्यामुळे Whatsapp च काम सुद्धा होत नव्हतं.

शेवटी त्यांनी त्यांच्या मित्रांकडून मदत घ्यायचे ठरवले. त्यांनी मित्रांना भेटून Whatsapp विषयी सांगितले आणि ते ऐकून त्यांचे सर्व मित्र त्यांना मदत करायला तयार झाले व त्यांना काही पैसे देऊ केले. त्यानंतर दोघेही दिवसरात्र Whatsapp Devlop करण्यात मग्न झाले.

2010 ते 2014 पर्यंत Whatsapp चे Users जगभरात पोहोचले. 2014 च्या शेवटी पर्यंत Whatsapp चे तब्बल 60 करोड users झाले होते. त्यावेळी Whatsapp फास्ट वाढत होते. दर महिन्याला Whatsapp चे 2.5 करोड पेक्षा जास्त user वाढत होते. Whatsapp तब्बल 1
लाख करोड मध्ये विकत घेतलं.* फेसबुक ने यासाठी तब्बल २० बिलियन डॉलर मध्ये मोजले होते
आजही जगभरात Whatsapp चे active user आहेत आणि दुसऱ्या messenger app ना मागे टाकून Whatsapp जगात अव्वल बनलं आहे.

पोस्ट आवडल्यास शेयर करा.....

3 comments:

 1. Very nice
  Keep IT up
  Dude you're are doing very geagrate work
  One day you wel get the success in your Life
  Thanks you

  ReplyDelete

Powered by Blogger.