Header Ads

अशा प्रकारे टिकवा तुमच्या मोबाइलची बॅटरी (Mobile Battary Tips In Marathi)

मित्रांनो, आजकाल मोबाइलला आपण इतके चिकटलो आहे कि मोबाइलला चार्जिंगला लावल्यावर सुद्धा, तो कधी Charge होतो आणि आपल्या हातात येतो असं झालंय. मोबाइल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा बनलाय. आणि अशावेळेस आपली बॅटरी आपल्याला धोका देते. जस जसं मोबाईल च वय वाढतं तशी तशी मोबाईलची बॅटरी लाईफ कमी होत जाते. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा चार्जे करावे लागते. तर मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला बॅटरी लाईफ कशी वाढवायची आणि मोबाईल फास्ट कसा Charge करायचा या बद्दल माहिती सांगणार आहे. 1) Flight मोड किंवा Airplane Mode ON करा 


 मोड चा वापर करा त्यासाठी फक्त मोबाइलला Charging लावल्यावर हा मोड ON करा,
या मोड चा वापर फास्ट चार्जिंग करण्यासाठी खूप वेळा केला जातो. जर तुम्हाला फास्ट चार्जिंग करायची आहे आणि तुम्हाला महत्त्वाचे कॉल सुद्धा येणार नसतील तर हा मोड खास तुमच्यासाठी बनला आहे  त्यासाठी फक्त मोबाइलला Chargingला लावल्यावर हा मोड ON करा.

2) Battary Saver किंवा Low Power मोड ऑन  करा.


Battary Saver हा मोड खूप फायद्याचा आहे. सगळ्या स्मार्टफोन ना  Battary Saver किंवा Low Power मोड असतातच ते ON केल्याने तुमची बॅटरी दीर्घकाळ टिकू शकते .

3) मोबाईलच्या तापमानावर लक्ष ठेवा


जर तुम्ही जास्त तापमानाच्या ठिकाणी मोबाइलला वापरात असाल तर ते तुमच्या मोबाईलसाठी हानिकारक ठरू शकते. कारण तश्या ठिकाणी मोबाईल गरम व्हायला लागतो आणि बॅटरी चा परफ़ॉर्मन्स कमी होतो. जर तुम्ही कारमधून प्रवास करत असाल तर मोबाइलला कारच्या Dashboard वर ठेऊ नका.

4) लोकेशन किंवा लोकेशन ट्रॅकिंग बंद करा


मित्रांनो लोकेशन हे feature उत्तम जरी असलं तरी त्याचा कमीत कमी वापर करायचा प्रयत्न करा. चालू असेल तर आत्ताच बंद करा. याने तुम्ही बॅटरी अजून जास्त टिकू शकते.

5) मोबाईल पूर्ण charge करण्यापेक्षा थोडा थोडा Charge करा


मित्रांनो आपण मोबाइलला पूर्ण चार्जे करत असतो पण तुम्हला माहितेय का जर आपण मोबाईलच चार्जिंग TimeTable बनवलं तर मोबाइलची Battary खूप वेळपर्यंत टिकू शकते. म्हणजे तुमची मोबाईलची Charging  २०% टक्के आहे तर तुम्ही फक्त ८० तर ८५% टक्क्यापर्यंत मोबाइलला चार्जे करत राहा आणि हेच मोबाइलला चार्जिंग Timetable  बनवा यामुळे तुमची Battary Life टिकेल आणि खूप वेळपर्यंत चालेल. मोबाइलला चार्जिंग बद्दल खूप लोकांना असं वाटत कि मोबाइलला पूर्ण राञभर चार्जिंग ला ठेवलं तर मोबाइलला फुटतो हे सरासर खोटं आहे. खरं तर Mobile मध्ये एक सिस्टिम असते, चार्जिंग System असते जी मोबाइल पूर्ण चार्जे झाल्यावर करंट बंद करून टाकते. मित्रांनो तो स्मार्टफोन आहे त्याला सगळं कळतं.

6) Brightness कमी करा


मोबाइलची सगळ्यात जास्त Battary खर्च होते डिस्प्ले वर त्यामुळे Brightness कधीपण कमी ठेवा. किंवा ऑटो Brightness मोड चालू करा याचा पण तुम्हला खूप फायदा होईल. ते तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन चालू करू शकता.

7) Wifi बंद करा


जर तुम्ही wifi चा वापर करत नसाल तर ते ऑफ करा. वायफाय सुद्धा तुमची खूप Battary खर्च करत. तसेच  जर तुम्ही ब्लूटूथ वापरात नसाल तर ते ऑफ करा मी भरपूर जणांचे मोबाइल बघितले आहेत त्यांचे wifi, ब्लूटूथ नेहमी चालूच असतात.

8) दोन्ही सिम 4G त वापरणे टाळा.


मित्रांनो जर तुमचा मोबाईल ड्युअल 4G सिम ला सपोर्ट करत असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर उत्तम आहे परंतु ते तुमची Battary खर्च करते . त्यामुळे ज्या सिमचा उपयोग तुम्ही इंटरनेट चालवायला करता तोच  4G  ठेवा दुसऱ्या सिम ला 2G करा.

9) नकली charger चा वापर करू नका


मित्रांनो बाजारात खूप असे चार्जेर आहे ज्यामुळे तुमच्या मोबाईलची चार्जिंग खूप फास्ट होते पण फास्ट उतरते सुद्धा  त्यामुळे जे तुमच्या कंपनीचं ओरिजिनल Charger आहे तेच वापरा. खराब झालं हरवलं असेल तर लगेच नवीन घ्या पण नकली चार्जेर वापरून मोबाईलची Battary खराब करू नका.

10) अनावश्यक Apps घेऊ नका


अनावश्यक Apps घेऊ नका. तसेच जे Apps तुमची battary खर्च करेल असे अँप्स इन्स्टॉल करू नका.


जर तुम्हाला पोस्ट आवडली असेल तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना लिंक Share करा.

4 comments:

 1. Mast.....I will deffinetly try this. .
  And sir plese make blog on. ..best android phones in market. ..

  ReplyDelete
  Replies
  1. ok I Will Make 'Best Android Mobiles till 2019' post soon. keep supportng me thanks for commenting....

   Delete
 2. Nice work brother....
  Keep it up,
  I will you support you...

  ReplyDelete

Powered by Blogger.