Header Ads

रेडमी गो ठरेल xiaomi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

शाओमी ने रेडमी नोट 7, नोट 7 प्रो सारखे महागडे फोन्स लाँच केल्यांनतर आता स्वस्त स्मार्टफोन्स कडे मोर्चा वळवला आहे. शाओमी 'रेडमी गो' हा मोबाइल भारतात उतरविण्याच्या तयारीत आहे. शाओमीच्या या सर्वात स्वस्त स्मार्टफोन ची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा स्मार्टफोन फक्त 4500 रु विकत घेता येणार आहे. चीनमध्ये लाँच केल्यांनतर हा स्मार्टफोन शाओमी 19 मार्च रोजी दिल्ली येथे लाँच करणार आहे.



वैशिष्ट्ये 


रेडमी गो चा डिस्प्ले 5 इंचचा असणार आहे. 10 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइमसह 3000 mah बॅटरी यामध्ये येणार आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेलचा मागील बाजूचा तर समोरील बाजूस 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलंय. 8 मेगापिक्सेल च्या कॅमेऱ्याने तुम्ही High Quality फोटोस आणि 1080p मधून विडिओ रेकॉर्डिंग करू शकता. रेडमी गो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी 2 सिम आणि एक SD कार्ड वापरू शकता. Noise Cancelling साठी यात खास माइक देण्यात आले आहे. रेडमी गो अँड्रॉइड चा 'अँड्रॉइड गो' प्रणाली वर काम करणार आहे. रेडमी गो मध्ये Qualcomm® Snapdragon™ 425 Processor असणार आहे.


काय असेल किंमत 

रेडमी गो च्या 1GB/8GB ची किंमत अंदाजे 4500 रु तर 1GB /16GB ची किंमत अधिकृतपणे शाओमी ने जाहीर केलेली नाही. परंतु 19 मार्च ला दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात शाओमी त्याची माहिती देईल.

कुठे खरेदी करता येईल?

रेडमी गो 19 मार्च नंतर शाओमी चा अधिकृत वेबसाईट mi.com तसेच फ्लिपकार्ट वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

4 comments:

Powered by Blogger.